स्मॉल स्क्रीनवर मनोरंजनाचा डबल धमाका

  94

स्मॉल स्क्रीनवर मनोरंजनाचा डबल धमाका


 झी मराठीवर येत्या १९ डिसेंबरला‘मन झालं बाजिंद’,‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला यणार आहेत आणि याच महाएपिसोड च्या साक्षीने ‘देवमाणूस २’ चा महाआरंभ होणार आहे.


पश्चिम महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात हळदीच्या पिकाची पूजा केली जाते, या पार्श्वभूमीवर हा महाएपिसोड रंगणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशा पद्धतीने हळदीची पूजा दाखवली जाणार आहे,


 या महाएपिसोडमध्ये विधाते कुटुंबातील सर्वजण हळदीच्या पूजेची तयारी करून शेतात जातात. दुसरीकडे राया कारखान्यातील भेसळ प्रकरणात गुन्हेगार असलेल्या ह्रतिक आणि पप्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार का? सोबतच राया कृष्णाला मानानं तिचं कारखान्यातील पद परत करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वीटू आणि ओमच लग्न पार पडणार आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत. कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. कोकणच्या मातीत रंगलेला हा ओम आणि स्वीटूचा लग्नासोहोळा हे या १ तासाच्या विशेष भागाचं खास आकर्षण असणार आहे.


या दोन मालिकांसोबतच प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं असा 'देवमाणूस चा महाआरंभ होणार आहे.

Comments
Add Comment

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात

Shefali Jariwala Death: ज्याचा विचार करत होती, त्याच्यासारखेच मरण आलं! शेफालीची 'ती' पोस्ट व्हायरल

EX बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाबाबत शेफालीची शेवटची पोस्ट व्हायरल  'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे