लाच घेणाऱ्या अभियंत्यावर कारवाई

नालासोपारा (वार्ताहर) :वसईत असलेल्या औद्योगिक गाळ्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी एका अभियंत्याने लाच मागितली असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच अँटी करप्शन ब्युरो यांनी सापळा रचून या अभियंत्याला अटक केली आहे. अभियंत्याने ८४ हजार रुपयांची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.

वसईच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या औद्योगिक गाळ्यांमध्ये विद्युत यंत्रणा जोडण्यासाठी निरीक्षण करून त्याठिकाणी जोडणी देण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या अभियंता राजू गीते याने लाच घेतल्याचे समोर आले आहे. अभियंता राजू गीते (५७) सोबतच त्याच्या साथीदाराला बुधवारी अँटी करप्शन ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे.

वसईत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गाळे बांधण्यात आलेले आहेत. त्यामध्ये विद्युत जोडणी करणे योग्य आहे, त्याचे फिटनेसचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या वालीव शाखेच्या अभियंत्याने तब्बल वीस गाळ्यांच्या मालकांकडून ९०,००० रुपयांची मागणी केली होती. प्रत्येक गाळ्याच्या मालकाकडून ४,५०० रुपयांची मागणी केली होती. परंतु नव्वद हजारी मोठी रक्कम असल्याने अखेर ८४,००० घ्यायचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी राजू गीते यांनी आपल्या साथीदाराला सागर गोरड (२९) याला पाठवले. रक्कम घेतल्यानंतर सागर याने राजू गीते यांना फोनवरून हे संपूर्ण गोष्टीची माहिती दिली. परंतु, तक्रारदाराने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरो ने राजू गीते आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर