मुंबई (विशेष प्रतिनिधी)- राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नेमणुकीचे राज्यपालांकडे असलेले अधिकार काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यपाल विरूदध सरकार, असा नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक राज्यपाल करतात. यासाठी राज्यपालांनी तज्ज्ञांची एक शिफारस समितीही नेमली आहे. पण, सरकारला या नियुक्त्या मान्य असल्याचे दिसत नाही. सरकारने यापुढे सरकारने शिफारस केलेल्या व्यक्तीचीच राज्यपालांनी नियुक्ती करावी, असा कायदा करण्याचे ठरवले आहे. त्याचसोबत कुलपतींबरोबरच एक प्रकुलपती पद निर्माण करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फुटल्याचा धक्का बसल्यानंतर आता पुन्हा त्याची प्रचिती घ्यावी लागू नये, म्हणून राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला. याकरीता नियमात आवश्यक तो बदल करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…