नवी मुंबई (प्रतिनिधी): सिडकोकडून नवीन वर्षात महागृहनिर्माण योजना राबवण्यात येणार असून आणखी पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात ‘महागृहनिर्माण योजने’अंतर्गत या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे नवी मुंबईत हक्काचे घर घेण्यासाठी अनेकांना नवी संधी पुन्हा चालून आली आहे.
या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत. सिडकोने आतापर्यंत अनेक गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आपले हक्काचे घर घेता आले आहे. ‘परवडणारी घरे’ या संकल्पनेनुसार सिडकोने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी योजना राबवली असून त्यातून अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले आहे. याच अंतर्गत आता नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, सिडकोच्या वतीने महागृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे. यामध्ये पाच हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…