बदलापूर : ९ डिसेंबरपासून कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शेअर रिक्षाचे किमान भाडे नऊ रुपये केल्याने या नवीन दरपत्रकावर रिक्षा संघटना नाराज आहेत. सर्वेक्षण न करताच ही भाडे कपात केल्याचा आरोप रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यानी केला आहे.
याबाबत रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग खजिनदार अविनाश खिलारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता रिक्षाचे किमान भाडे ९ रुपये हे फारच कमी असून ते १२ ते १५ रुपये तरी असायला पाहिजे, असे खिलारे यांचे म्हणणे आहे. तसेच कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्वेक्षण करताना रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पालिकेचे अभियंता, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह शेअर रिक्षा मार्गांचे सर्वेक्षण करून त्यानंतर शेअर मार्गाचे दर निश्चित करायला हवे होते व त्यानंतर याबाबत सूचना हरकती मागवून हे दर अंतिम करायला पाहिजे होते. मात्र, असे न करताच रिक्षा शेअर मार्गाचे दर निश्चित करण्यात आले असल्याचा आरोप अविनाश खिलारे यांनी केला.
त्यामुळे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केलेल्या या दरांबाबत रिक्षाचालकांमध्ये नाराजी असून महासंघाच्या वतीने पुन:सर्वेक्षण करून नव्याने दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती खिलारे यांनी दिली आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…