आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

दुबई (वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला वनडे वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताची सलामी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ६ मार्चला होईल. यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील लढतीने (४ मार्च) विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होईल.


न्यूझीलंडमध्ये ३१ दिवस रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे ३० मार्च रोजी तसेच दुसरा उपांत्य सामना ३१ मार्चला होईल. विजेतेपदाचा सामना ३ एप्रिलला रंगेल. अंतिम लढत ख्राइस्टचर्चवर होईल. वर्ल्डकप स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, जिथे प्रत्येक संघाला इतर प्रत्येक संघाशी स्पर्धा करावी लागेल आणि गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.


ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०१७-२० मधील त्यांच्या स्थानांनुसार वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. यजमान असल्यामुळे न्यूझीलंड संघ आपोआप पात्र ठरला.




भारताच्या लढती


६ मार्च वि. पाकिस्तान टौरंगा
१० मार्च वि. न्यूझीलंड हॅमिल्टन
१२ मार्च वि. वेस्ट इंडिज हॅमिल्टन
१६ मार्च वि. इंग्लंड टौरंगा
१९ मार्च वि. ऑस्ट्रेलिया ऑकलंड
२२ मार्च वि. बांगलादेश हॅमिल्टन
२७ मार्च वि. दक्षिण आफ्रिका ख्राइस्टचर्च
Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे