सोलापूर - राज्यात २ लाख एकरांवरील द्राक्षाचे नुकसान, अवकाळी पावसाचा फटका

सोलापूर  : अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष उत्पादन संकटात सापडले आहेत. शासनाच्या मदतीशिवाय बागाईतदारांना जगणे अशक्य आहे. शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी केली आहे. पवार यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उत्तर तालुक्यातील पडसाळी, नान्नज व दारफळ येथील द्राक्षबागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात जवळपास ५ लाख एकर द्राक्ष क्षेत्र आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांची द्राक्ष उत्पादकांची अवस्था शासनाला माहीतच आहे. यावर्षी जून महिन्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत राहिला. त्यामुळे राज्यात दोन लाख एकरांवरील बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागायतदारांना येणारा खर्च व त्या तुलनेत न मिळणाऱ्या उत्पादनाची सांगड घालून शासनाने द्राक्ष बागांसाठी पॅकेज देण्याची मागणी पवार यांनी केली. द्राक्ष शेती वाचली नाही तर शासनाला करही मिळणार नाही, असे पवार म्हणाले.





Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ