निवडणुकीत घोडेबाजार झाला - नवाब मलिक

मुंबई : अकोला आणि नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार (horse trading) झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.


या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे, हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर कायदा झाला पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.


राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू, मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्र सरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे करु, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर