मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार!

मुंबई : मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बुधवारी सुरू होणार आहेत. शाळा कोणत्याही स्थितीत सुरु होणार आणि त्याच्यात कोणताही बद्दल होणार नाही, असे शिक्षण विभागाने सांगितेल आहे. 


राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर १ डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai School) उद्यापासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.


मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. तसेच मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. तसेच याबाबत काही शाळांना माहिती मिळाली नसल्याने त्यांना पुन्हा सुचना दिल्या जाणार आहेत, असे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.


शाळा सुरू करण्यासाठी आज मंगळवारी, १४ डिसेंबर रोजी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात काही राहिलेल्या अडचणींवर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.


राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, अशी शक्यता पालकांमध्ये व्यक्ती केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केलंय. शाळेत आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे.


महापालिकेच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापनाची वर्ग सुरु करण्याची तयारी आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे. काही ठिकाणी ओमायक्रोनच्या भितीने विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या विनंती मध्ये आहे असे काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतली आहे.


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा धोका निर्माण झाल्यामुळे मुंबईसह अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. कोरोना नियंत्रणात असल्याने व नविन व्हेरिएंट असलेल्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा धोकाही जाणवत नसल्याने मुंबई महापालिकेने आता शाळा १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री