सावधान ! राज्यात आज आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद

मुंबई : आज राज्यात  आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैक सात रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण वसई विरार येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 9 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 492 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 70 , 63, 688 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 784 नवे कोरोनारुग्ण


देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5 हजार 784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 252 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात

ओमायक्रॉनचे 41 जण बाधित सापडले आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 88 हजार 993 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 888 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7 हजार 995 कोरोनाबाधित बरे झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 38 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Comments
Add Comment

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’