Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पंतप्रधानांनी केले गंगास्नान

पंतप्रधानांनी केले गंगास्नान

बनारस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे गंगास्नान केले. (The Prime Minister took a Ganga bath) काशी विश्वनाथ कॅरिडोअरचा आज, त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी कालभैरव मंदिरात पूजा आणि गंगा नदीत स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण केले.

पंतप्रधानांचे काशी नगरीत आगमन होताच स्थानिकांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी हा संपूर्ण परिसर मोदी मोदी आणि हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी खिरकिया घाट ते ललिता घाट हा बोट प्रवास करत काशी विश्वनाथ मंदिर भेटीसाठी प्रयाण केले. यावेळी त्यांनी कालभैरव मंदिरात दर्शन घेतले. तसेच गंगा नदीत स्नान करून पूजन केले. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॅरिडोअर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी भागाला जोडणारा आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ३३९ कोटी आहे.

Comments
Add Comment