नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव?

  106

वर्धा : वेगळ्या विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव नाही, अशी माहिती केंद्राने लोकसभेत दिली होती. त्यानंतर विदर्भवादी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबतची एक ऑडिओ क्लीप समोर आली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना काळं फासण्याचा डाव असल्याचे उघडकीस आले आहे. भाजप आमदार समीर कुणावार (Sameer Kunawar) आणि प्रवीण महाजन (Pravin Mahajan) या दोन व्यक्तींमधील ही क्लीप व्हायरल झाली आहे.


समीर कुणावार हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार आहेत. तसेच गडकरींचा रविवारी हिंगणघाट येथे कार्यक्रम होता. यावेळी गडकरींद्वारे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा केंद्रात पाठविण्याची मागणी प्रविण महाजन यांनी ऑडिओ क्लीपमध्ये केली आहे. आमच्याजवळ शाई असेल आणि आम्ही गडकरींना वेगळ्या विदर्भाची मागणी करू, असं महाजन भाजप आमदार समीर कुणावार यांना सांगतात. मात्र, या गोष्टी हिंगणघाटात नको, तुम्हाला नागपुरात जाऊन जे करायचे ते करा, असा सल्ला समीर कुणावार यांनी दिला आहे.


''आज सायंकाळी निवेदन घेऊन गडकरींकडे येत आहे. सोबत शाई आणणार आहे. तसेच त्यांना निवेदन देणार आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी गडकरींना तोंडी कळवणार आहे'', असं प्रविण महाजन बोलतात. त्यावर आमदार कुणावार म्हणतात, असं काहीही करू नका. त्यानंतर महाजन म्हणतात ''आम्हाला वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर मीडियापुढे स्टंट करायचा आहे. गडकरींची बदनामी करण्याचा उद्देश नाही. मंचाच्या खाली उभं राहून गडकरींना काळं फासून वेगळ्या विदर्भाचा दिल्लीत पाठवायचा आहे.'' त्यानंतर आमदार कुणावार त्यांना समजावत असल्याचे या ऑडिओ क्लीपमधून समजते.



गडकरींची मानहानी करण्याचा हेतू नाही


ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रवीण महाजन याचा एक मेसेज आणखी व्हायरल झाला आहे. माझ्याकडून चुकीने आमदार समीर कुणावार यांच्यासोबत केलेल्या संभाषणाची ऑडीओ व्हायरल झाली. माझा याबाबत मंत्री नितीन गडकरींची मानहानी करण्याचा हेतू नव्हता. मला असे करावे का? असा विचार माझ्या मनात आला होता. म्हणून मी आमदार कुणावार यांना फोन केला होता. असं काही करण्याचा उद्देश नव्हता आणि नाही. यासाठी मी खुलासा करत असून काही लोकांच्या मनात गैरसमज असतील तर मला माफ करा, असा मेसेज महाजन यांच्या नावाने व्हायरल झाला आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची