देवमाणूस २ चा महाआरंभ!

मुंबई :  झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



या मालिकेच्या दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी टीव्हीवर पाहिला आणि सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन २० डिसेंबरपासून रात्री 10.30 वाजता सोमवार ते शनिवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.






मात्र यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे? याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे.


सोमवारपासून 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'देवमाणूस २' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय..तसंच येत्या रविवारी देवमाणूसचा एका तासाचा विशेष भाग स्मॉल स्क्रीनवरील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Comments
Add Comment

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या

सुबोध भावे आणि मानसी नाईक जोडी प्रथमच एकत्र

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

अभिषेक-ऐश्वर्या यांचा युट्यूबविरुद्ध खटला

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडीओंबद्दल युट्यूब आणि गुगलविरुद्ध दिल्ली

'मनाचे श्लोक' टीमकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये