मराठी बॉक्स ऑफिसवर ''डार्लिंग''चाच बोलबाला

मुंबई : दुसऱ्या लॉकडाऊननंतर सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर शुभशकून देत प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनंतर ''डार्लिंग'' या लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर आज ''डार्लिंग''चाच बोलबाला आहे. प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री या ''टकाटक'' जोडीचा जलवा थिएटरमध्ये पुन्हा पहायला मिळत आहे. रसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात समीर आशा पाटील दिग्दर्शित ''डार्लिंग'' या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अ स्ट्रेस बस्टर फॅमिली एन्टरटेनर हि ''डार्लिंग''च्या पोस्टरवर देण्यात आलेली टॅगलाईन मराठी सिनेरसिकांनी खरी ठरवली आहे. ''डार्लिंग''ला मिळणाऱ्या प्रतिसादाचं संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या टिमनं रसिक मायबाप यांना दिलं आहे.


लॉकडाऊनमुळं प्रेक्षकांच्या भेटीपासून दुरावलेला ''डार्लिंग'' अखेर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये ''डार्लिंग''च्या गाण्यांवर रसिक अक्षरश: तल्लीन होऊन नाचत असल्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. २५० हून सिनेमागृहांमध्ये ३००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला ''डार्लिंग'' पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हडपसर, खर्डा, रहाटणी, नारायणगाव, तळेगाव, नाशिक, लातूर, नांदेड, अकलूज, अमरावती, खान्देश, चिंचवड, सोनाई, कामोठे, गोरेगाव, वाळूंज, औरंगाबाद, सिटिप्राईड अभिरूची येथे रविवारी हाऊसफुलचे बोर्ड झळकले.


प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला निखिल चव्हाणनं साकारलेला राजभाऊही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातील काही तरुणांचं प्रतिनिधीत्व करणारा असल्यानं तोदेखील लक्ष वेधून घेत आहे. टायटलवरून जरी हा चित्रपट केवळ प्रेमकथा असल्यासारखा वाटत असला तरी मूळात हा फॅमिली एन्टरटेनर असल्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारं कथानक, पूर्वार्धात केलेली व्यक्तिरेखा आणि पटकथेची बांधणी, उत्तरार्धात त्याला जोडलेली इमोशनची किनार, तंत्रशुद्ध दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय, प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी केलेलं अचूक कास्टिंग, सुमधूर संगीत, नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये अशी एक ना अनेक कारणं ''डार्लिंग''ला चहू बाजूंनी परफेक्ट बनवणारी आहेत. तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ताल धरायला लावण्याची क्षमता ''डार्लिंग''च्या गाण्यांमध्ये असल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आणि शहरांमध्ये जाऊन प्रमोशन करताना केलेल्या आवाहनाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानं ५० टक्के आसनक्षमता असूनही अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं