नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० मध्ये एक्स्प्रेस वे सह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती संसदेत देण्यात आली. तर २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले.
यावेळी गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर इत्यादींचा समावेश होतो.
दरम्यान मंत्रालयाने सर्व टप्प्यांवर सुरक्षा ऑडिटद्वारे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रचना, बांधकाम आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मार्च-एप्रिल २०२१ मध्ये ऑक्सिजन संकटाच्या वेळी, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर हाताळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र प्रशिक्षित ड्रायव्हर्सची कमतरता नोंदवली गेली होती.
“लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीची गरज, ऑक्सिजन व्यवस्थापनाचा विस्तारित कालावधी, क्रायोजेनिक टँकरच्या यादीत वाढ यामुळे जास्त थकवा/अपघात दर लक्षात घेऊन मंत्रालयाने धोकादायक मालवाहतुकीसाठी प्रशिक्षित चालक तयार करण्यासाठी राज्यांना सल्लागार जारी केला,” असे गडकरी म्हणाले. तर राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ ते २०१८ या कालावधीतील आकडेवारीच्या आधारे एकूण ५,८०३ ब्लॅक स्पॉट्स ओळखले गेले आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“दिल्ली, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या संबंधित राज्यांमधून वाहने, मोबाईल फोन आणि कागदपत्रे चोरीच्या तक्रारींसाठी नागरिक सेवा पोर्टलवर ऑनलाइन ई-एफआयआरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे,” असे नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट अंतर्गत ७,३५० कोटी रुपयांच्या सवलतीच्या मूल्यासह आणि भांडवली खर्चासह ३८० किमी राष्ट्रीय महामार्ग कार्यान्वित केले असल्याची माहिती दिली होती. त्यातून ४९५ कोटी रुपयांची कमाई करण्यात आली आहे. याशिवाय टोल ऑपरेट ट्रान्सफर मोड अंतर्गत ४५० किमी लांबीच्या महामार्गासाठी निविदा जारी करण्यात आली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…