मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने देशमुख कुटुंबीयांना 10 जानेवारी 2022 पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.
मुंबईच्या वरळी परिसरातील सदनिका आणि उरणमधील जमीन अशा मिळून सुमारे 4 कोटी 20 लाख रुपये मूल्याच्या मालमत्तांवर ईडीने हंगामी टांच आणली आहे. त्याविषयी न्यायिक प्राधिकरणाकडून अंतिम आदेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी घेणाऱ्या न्यायिक प्राधिकरणात अध्यक्ष आणि दोन सदस्य आवश्यक असतात. मात्र, सध्या केवळ एक सदस्य असून त्यांना विधी क्षेत्राचे ज्ञानही नाही, असा दावा देशमुख यांच्यातर्फे करण्यात आला. त्यामुळे हंगामी आदेश देत सुनावणी सुरू ठेवावी.
मात्र, 10 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम आदेश करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याला ईडीने अर्जाद्वारे आक्षेप घेतला. त्याविषयी न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आज, शुक्रवारी सुनावणी घेतल्यानंतर न्यायिक प्राधिकारणाच्या एकल सदस्यांना सुनावणी घेता येईल आणि अंतिम आदेशही करता येईल. मात्र, देशमुख यांच्याविरोधात कोणताही आदेश काढला तर तो उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…