मुंबई (प्रतिनिधी): राजस्थान सरकारने महाराष्ट्रातील विविध विभागांत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय भागीदार सीआयआयबरोबर गुंतवणूकदार जोडणी अभियानाचे (इन्व्हेस्ट राजस्थान) आयोजन मुंबईत केले होते. राज्यस्तरीय गुंतवणूकदारांच्या बैठकीच्या साथीने राज्याने यशस्वीपणे १,२७,४५९ कोटी रुपये मूल्याचे सामंजस्य करार आणि ६७,३७९ कोटी रुपये मूल्याची उद्देशीय पत्रे (एलओआय) अशी मिळून एकूण १,९४,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यावेळी राजस्थानच्या औद्योगिक आणि वाणिज्य मंत्री शकुंतला रावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जेएसडब्ल्यू फ्युचर एनर्जीने जैसलमेर जिल्ह्यात १०,००० मेगावॉटचा पुनर्वापर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ४०,००० कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रस्ताव ठेवला आहे. वेदांत समूहाने राज्यांत ३३,३५० कोटी रुपये मूल्याचा विस्तार प्रस्ताव सादर केला आहे. ग्रीनको एनर्जीजने एकात्मिक अक्षय ऊर्जा साठवणूक प्रकल्पासाठी ३०,००० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला आहे. अदानी ग्रीन एनर्जीने जैसलमेर, बारमेर, जालोर आणि जोधपूर येथील ४००० मेगावॉट च्या अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी २०,००० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे तर; अदानी टोटल गॅसने उदयपूर, भिलवारा, चितोडगड आणि बुंदी येथील सिटी गॅस पुरवठा प्रकल्पासाठी ३००० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला आहे. क्रिश फार्माने ७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सिरोही मध्ये औषधनिर्माण उत्पादन केंद्राचा प्रस्ताव मांडला आहे. इतर ४० प्रस्तावित प्रकल्पांमध्ये यांचा समावेश आहे.