दिग्गज फुटबॉलपटू पेले केमोथेरपीसाठी रुग्णालयात

नवी दिल्ली : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर असल्याने त्यावर केमोथेरपी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांच्यावर साओ पावलो येथील अलबर्ट आईनस्टाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती पेले यांच्या प्रवक्त्यांनी दिली.


सध्या पेले यांची प्रकृती स्थिर असून त्यांना येत्या काही दिवसात रुग्णलायातून सुट्टी मिळेल, असेही त्या प्रवक्त्यांनी सांगितले. दरम्यान, पेले यांच्या मोठ्या आतड्यातील ट्युमरवर सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली होती.


८१ वर्षीय पेले यांनी ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप जिंकून दिला होता. फिफाने २००० मध्ये पेले यांना प्लेयर ऑफ द सेंच्युरी हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या डिएगो मॅराडोना यांच्याबरोबर विभागून दिला होता.

Comments
Add Comment

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१