मुंबई : संजय राऊत यांना दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या या फोटोचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून त्यावर काही ठिकाणी खिल्ली तर काही ठिकाणी टीका केली जात आहे. बहुतांश भाजप नेत्यांनी या व्हायरल फोटोवरुन संजय राऊत आणि शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
भाजपकडून करण्यात येणाऱ्या या टीकेबाबत संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारून या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या प्रत्युत्तराची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी उच्चारलेल्या शब्दामुळे समस्त भाजप नेत्यांचा अपमान झाला असल्याचा दावा करत भाजप महिला आघाडीने त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. एकीकडे आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता संजय राऊत यांच्यावरही या टीकेबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
भाजपच्या माहिममधील नगरसेविका शीतल गंभीर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. संजय राऊतांनी जे शब्द वापरलेत त्याच्याविरोधात आम्ही जबाब दिलेला आहे. तसेच आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस गुन्हा दाखल करतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या.
संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरुन लैंगिक शेरे करुन भाजप पक्षातील समस्त महिला वर्गाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यांचे हे शब्द अत्यंत बिभत्स, अश्लिल तसेच मनास लज्जा उत्पन्न करणारे असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर संजय राऊत यांनी तोच शब्द वापरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. जगात ”चू**” लोकांची कमी नाही. एक शोधायला गेलं तर हजार सापडतील. आता योगींनाच ऐका, असं संजय राऊत म्हणाले. त्याचा अर्थ हिंदीमध्ये मूर्ख असा होतो. तुम्ही तुमचा शब्दकोश वाढवा, असेही संजय राऊत म्हणाले.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…