शिवाजी पार्कमध्ये रंगला 'फ्रि हिट दणका'चा क्रिकेट सामना

  90

मुंबई : खेळाडूंची धावपळ... चौकार... षटकार... अटीतटीचा सामना...प्रेक्षकांमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता... तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल ना की, ही क्रिकेटची मॅच नक्की कुठे सुरु आहे. तर ही मॅच रंगली होती दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात. ''फ्रि हिट दणका''ची टीम विरुद्ध मीडिया आणि शिवाजी पार्क मैदानातील खेळाडू. या अटीतटीच्या सामन्यात अखेर ''फ्रि हिट दणका''ने आपला दणका दाखवलाच. इतक्या दिवसांची मेहनत अखेर फळाला आली. या क्रिकेटच्या सामन्यात ''फॅन्ड्री'' फेम सोमनाथ अवघडे, अपूर्वा एस., ''सैराट'' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज शेख(सल्या) आणि तानाजी गालगुंडे(लंगड्या) हरीश थोरात, सुनील मगरे यांच्यासह अनेकांनी या मॅचमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे विजेत्यांचे कौतुक करण्याबरोबरच या सामन्यात सहभागी झालेल्या शिवाजी पार्कमधील क्रिकेटप्रेमींनाही यावेळी क्रिकेट किट देऊन गौरवण्यात आले.

या क्रिकेट मॅचच्या निमित्ताने सोमनाथ अवघडेने एक किस्सा शेअर केला आहे. मुळात हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्याने क्रिकेटमधील अनेक बारकावे लक्षात घेणे खूप महत्वाचे होते. एरव्ही क्रिकेट खेळणे आणि रीतसर पद्धतीने क्रिकेट खेळणे यात खूप फरक आहे. जरीही तो अभिनय असला तरीही कुठेही तो अनैसर्गिक वाटू नये, यासाठी सोमनाथने खूप मेहनत घेतली आहे. त्याने सतत क्रिकेटचा सराव केला. व्हिडिओज बघितले. मिळेल त्या वेळात तो क्रिकेटचा सराव करायचा. एकदा अशीच सरावादरम्यान त्याला गंभीर दुखापतही झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्याने सराव केला आणि त्याच परिस्थितीत चित्रीकरणही पूर्ण केले. या दुखापतीचा त्याच्या चेहऱ्यावर कुठेही लवलेशही दिसला नाही. त्याची ही मेहनत प्रेक्षकांना ''फ्री हिट दणका''मध्ये दिसेलच.

''फ्री हिट दणका'' १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची असून लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे निर्मित या चित्रपटाचे नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे सहनिर्माता आहेत.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल