मुंबई : माजी लष्करप्रमुख बिपीन रावत हे देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स आहेत. संरक्षण प्रमुख व्हाया गोरखा बटालियन अशी त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली. येत्या ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या पदाला दोन वर्षे पूर्ण होणार होती.
बालपणीचे दिवस…
रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील एल. एस. रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचे बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले.
अमेरिकेत घेतले शिक्षण
इंडियन मिलिटरी अकादमीमधील चमकदार कामही पाहून रावत यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिलं सन्मानपत्र मिळाले. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवले आणि ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना भारतीय लष्कराच्या गोरखा वन रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली. इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केले.
परम विशिष्ट सेवासह अनेक पदके
आपल्या लष्करी सेवेदरम्यान रावत यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
पहिले सीडीएस
तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी सूत्रे स्वीकारली होती. जनरल रावत हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांनी संरक्षणप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. संरक्षणप्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वष्रे ही वयोमर्यादा असून रावत हे सध्या ६३ वर्षांचे आहेत. संरक्षणप्रमुख हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतात. २०१९ साली डिसेंबरच्या शेवटून दुसऱ्या आठवड्यात संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती. जनरल बिपीन रावत यांनी देशाचे २६ वे लष्करप्रमुख म्हणून निवृत्ती स्वीकारल्याच्या दिवशीच संरक्षणप्रमुख ही जबाबदारी खांद्यावर घेतली. संरक्षण तज्ञांनी १९९९ पासून अनेक वेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९मध्ये पाकिस्तानविरोधात झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…