ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह

  65

डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या त्या ३२ वर्षीय रुग्णाला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याची पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. तो रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. देशातील पहिली केस जी बरी होऊन घरी गेली आहे. या रुग्णाचा आजच वाढदिवस असल्याने हा रुग्ण बरा होऊन घरी गेला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.


केपटाऊनहून हा रुग्ण दुबई, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन डोंबिवलीत दाखल झाला होता. २६ नोव्हेंबरला तो मुंबईहून डोंबिवलीत प्रवास करुन आला होता. त्याला ताप आल्याने त्याने स्वत: जाऊन डॉक्टरकडे तपासणी केली. टेस्ट केली असता त्याची कोरोना टस्ट पॉझीटीव्ह आली होती. महापालिकेने त्याची गंभीर दखल घेत त्याला महापालिकेच्या कोविड रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्याचे नमुने जीनोम सिक्वेसिंगकरीता एनआयव्हीला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. राज्यातील हा पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण होता. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह राज्याची धास्ती वाढली होती. या रुग्णाला कोणतीही लक्षणं आढळून आली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर होती.


रिपोर्ट आल्यानंतर त्याची महापालिकेने पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे. रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. मात्र त्याला आणखी सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. रुग्णाचा आज वाढदिवस असल्याने त्याची आयुक्तांनी फोनवरुन विचारपूस करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही बाब महापालिकेसह देशासाठी समाधानकारक आणि दिलासा देणारी असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर