याप्रकरणी चाळीसगांव रोड पोलिस ठाण्यात रुक्साना बानो शेख सलीम रा.जनता सोसायटी या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मागील भांडणाच्या वादातून दाखल केलेली पोलिसातील तक्रार मागे घेतली नाही म्हणून नदीम काल्या उर्फ नदीम रज्जाक शेख सोबत हमीद नाट्या आणि वसीम रंधा या तिघांनी फिर्यादी रुक्साना बानो शेख हिची वहीनी नसीम बानो हिच्या घराचा दरवाजा उघडून घरात घुसून एका प्लॅस्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून माचीसने आग लावून दिली. त्यामुळे जनता सोसायटीतील ९ रहिवाशांची घरे जळून खाक झाली.
यात हसीना बी असलम खाटीक यांच्या घरात ८ लाख, कान्नु अन्सारी अब्दुला अन्सारी यांच्या घरातील २ लाख, निसार शेख यासीन याच्या घरातील १० लाखाचे, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांच्या घरात १० लाखाचे, मोइदोद्दीन गुलाम रसुल खाटीक याच्या घरातील ८ लाखाचे, शाकीराबी आरीफ शहा यांच्या घरातील ७ लाखाचे, रुक्सानाबी यासीन शहा यांच्या घरातील १० लाखाचे, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांच्या घरातील ५ लाखाचे आणि नियाज सैय्यद असलम यांच्या घरातील १० लाखाचे असे एकुण ७० लाखाचे नुकसान झाले.
याप्रकरणी नदीम काल्या, हमीद नाट्या व वसीम रंधा या तिघांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.