मुंबई : भारतीय संघाने सोमवारी अवघ्या ४३ मिनिटांत न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून दुसरी कसोटी जिंकली. भारताने ठेवलेल्या ५४० धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गडगडला. भारताने हा सामना ३७२ धावांनी जिंकलाय.
वानखेडेवर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडून शुबमन गिल (४४) अक्षर पटेल (५२), मयांक अग्रवाल (१५०), यांनी दमदार खेळ केला. मयांकने दुस-या डावातही (६२) अर्धशतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा (४७) विराट कोहली (३६) व अक्षर पटेल (४१) यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. गोलंदाजीत अक्षर पटेलनं ४, जयंत यादवनं ५ , मोहम्मद सिराजनं ३ तर आर अश्विनने दोन्ही डावांत ८ विकेटंस घेतल्या.
भारताने ७ बाद २७६ वर दुसरा डाव घोषित केला होता. भारतानं ही मालिका १-० अशी जिंकली.
सोमवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी केली. यामध्ये भारतीय संघानं पुन्हा एकदा अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे. भारतीय संघ 124 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकवर असणाऱ्या न्यूझीलंड संघाचे 121 गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 10/8 गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या नावावर 107 तर पाकिस्तानचे 92 गुण आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…