काँग्रेसच्या डोळ्यांदेखत ममता दीदींची शिवसेना, राष्ट्रवादीशी चर्चा!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेस आणि कम्युनिस्टांना डावलून तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात येथील सत्तेतल्या काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांदेखत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्याशी राजकीय चर्चा करणार आहेत.


ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यावर येताच त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. संध्याकाळी त्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये पोहोचतील आणि तेथेच त्या मुक्काम करणार आहेत. या काळात ते शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी येथील तसेच दिल्लीतील राजकीय विषयावर चर्चा करतील. या दौऱ्यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार होत्या. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांना न भेटण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला. त्यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करण्याचे ठरले. हे दोन्ही नेते बॅनर्जी यांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत.



आज सिल्व्हर ओकवर


ममता बॅनर्जी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेणार आहेत. दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक पहिल्या दिवशी कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेतल्या विरोधी पक्षांच्या १२ सदस्यांना या सत्रासाठी निलंबित करण्यात आले. मागच्या अधिवेशनात घातलेल्या गोंधळाच्या कारणांमुळे हे निलंबन करण्यात आले. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलावली होती. परंतु, ममता बॅनर्जी यांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर त्यांची शरद पवार यांच्याबरोबर होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक