औषध खरेदीचा प्रस्ताव ८ महिन्यांपासून प्रलंबित!

Share

सीमा दाते

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असलेली पावसाळी आजारांतील औषधे खरेदीचा प्रस्ताव गेल्या ८ महिन्यांपासून महापौर कार्यालयात प्रलंबित असून या प्रस्तावाची फाइल गहाळ झाली आहे. दरम्यान फाइल गहाळ कशी झाली किंवा कोणी केली? याबाबचा सवाल भाजपने विचारला आहे. ही फाइल महापौरांनी लपवून ठेवली असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

महापालिका मध्यवर्ती खरेदी खाते यांनी १७३ औषधांच्या प्रस्तावित खरेदीकरिता ई-निविदा मागवल्या होत्या. या निविदा प्रक्रिया ३१ जुलै २०२० ला पूर्ण करण्यात आल्या होत्या. मात्र या मसूदापत्रातील काही बाबींच्या खर्चास मान्यता देण्याचे अधिकार महापौरांना असल्यामुळे हे मसुदा पत्र ३० सप्टेंबर २०२० ला महापौरांकडे पाठवण्यात आले. मात्र सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या आठ महिन्यांत १८ स्मरणपत्रे महापौरांना पाठवण्यात आली. मात्र या एकाही पत्राचे उत्तर अथवा मसुदापत्र फाईल मध्यवर्ती खात्याला मिळालेली नाही. ही औषधे पावसाळ्यात साथीच्या आजारांसाठी असल्याने यांची जास्त आवश्यकता असते.

मात्र असे असताना या प्रस्तावाकडे महापौर कार्यालयाकडून दुर्लक्ष केले गेले. दरम्यान यासंबधीत असलेली फाइल महापौरांकडे ८ महिने प्रलंबित राहिली व नंतर फाइल गहाळ झाल्याचे शिंदे म्हणाले आहेत. तर हे प्रस्ताव महापौर कार्यालयातून गहाळ झाल्यामुळे प्रस्तावाची दुय्यम पत्र ९ नोव्हेंबरच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आली.

दरम्यान या प्रस्तावात काही निविदाकारांनी विधिग्राह्यता वाढवून देण्यास नकार दिल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे निविदाकारांना वाटप झालेल्या बाबींसाठी पुन्हा निविदा मागवाव्या लागणार आहेत. यामुळे महापालिका रुग्णालयांना औषधे मिळण्यास अधिक विलंब होणार आहे.
त्यामुळे महापौर कार्यालयाकडून हा हलगर्जीपणा असल्याचे देखील शिंदे म्हणाले आहेत. तर महापौर कार्यालयात कंत्राट, निविदांच्या फाइल किती काळ व कशासाठी प्रलंबित राहतात? तसेच आजपर्यंत किती फाईल प्रलंबित आहेत? यात महापौरांचा सहभाग किती? याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

Recent Posts

दहशतवादाला कोणतेही स्थान नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र…

5 minutes ago

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर होणार तपास

सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून करणार प्रभावी देखरेख मुंबई (प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या…

51 minutes ago

मुंबई मेट्रो व्यवस्थेला मिळाले आर्थिक पाठबळ

प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नात तिप्पट वाढ मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला…

2 hours ago

पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय…

2 hours ago

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

1 day ago