मुंबई : राज्याने गुरुवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ११ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
“महाराष्ट्रात ११ कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा टप्पा गाठण्यात यश आले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि लसीकरणाच्या कामात व्यस्त असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन,” अशा शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, “राज्यात ९ नोव्हेंबर रोजी १० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून राज्यात एक कोटींच्या वर नागरिकांना लस देण्याचे काम झाले आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानतो,” असं देखील टोपे म्हणाले.
तसेच “राज्यातील ३.७६ कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ७.२४ कोटी नागरिकांना एक मात्रा देण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…