मुंबई (प्रतिनिधी) : ओम साईश्वर सेवा मंडळ आयोजित पुरुष व महिला मुंबई जिल्हा खो खो निवड चाचणी स्पर्धेत ओम साईश्वरने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
महिला गटाच्या प्राथमि.क फेरीच्या पहिल्या सामन्यात दादरच्या वैभव स्पोर्ट्स क्लबने शिवनेरी सेवा मंडळ (ब) चा (१०-०१-०३) १०-०४ असा १ डाव व ६ गुणांनी पराभव केला. वैभव स्पोर्ट्स क्लब तर्फे अनिष्का पवार हिने नाबाद ३:०० व २:२० मि. संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. स्पृती चंदूलकर हिने ४:००, १:४० मि. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले तर शिवनेरी सेवा मंडळ (ब) संघातर्फे अनुष्का गौड हिने १:१०, १:०० मि. संरक्षण केले व आक्रमणात ३ गडी बाद करून चांगली लढत दिली.
महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळ, लालबागने विजय क्लब, दादरचा (११-०२-०३) ११-०५ असा १ डाव व ६ गुणांनी धुव्वा केला. ओम साईश्वरतर्फे आर्या तावडे हिने ४:०० मि. संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. रिया कदम हिने ५:१०, मि. संरक्षण केले व आक्रमणात १ गडी बाद केला तर विजयतर्फे श्रिया नाईक हिने २:०० मि. संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद करून चांगली लढत दिली. तिसऱ्या सामन्यात दादरच्या शिवनेरी सेवा मंडळ (अ) संघाने परळच्या आर्यसेना संघाचा (१४-०२-०३) १४-०५ असा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला. शिवनेरीतर्फे शिवानी गुप्ता हिने ३:१५ मि. संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. प्रतीक्षा महाजनने आक्रमणात ४ गडी बाद केले तर आर्यसेनातर्फे प्रतीक्षा राज हिने १:१० मि.. संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद करून चांगला खेळ केला.
पुरुष गटाच्या पहिल्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र (ब) परळने युवक क्रीडा मंडळ, परळचा (०९-०७-०७-०७) १६-१४ असा दोन गुणाने पराभव केला. विद्यार्थीतर्फे पियुष काडगे याने १:१० मि. संरक्षण केले तर आक्रमणात पाच गडी बाद केले. ओंकार शितप याने १:३० मि. संरक्षण केले व आक्रमणात तीन गडी बाद केले, अभय कदम याने १:००, २:५० मि. संरक्षण करून आक्रमणात एक गडी बाद केला. तर युवकतर्फे ओंकार घवाळी याने १:२०, १:०० मि. संरक्षण करून आक्रमणात दोन गडी बाद करून चांगली लढत दिली. दुसऱ्या सामन्यात लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाने दादरच्या वैभव स्पोर्ट्स क्लबचा (०५-०६-११-०७) १६-१३ असा तीन गुणाने पराभव केला.
ओम साईश्वरतर्फे भूपेश गायकवाडने १:४०, १:३० मि.. संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले. देवांगने २:५० मि.. संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी मि.ळवले, तर यश कणसेने १:२०, १:४० मि.. संरक्षण करून आक्रमणात दोन गडी बाद केले. तर वैभवतर्फे संकेत लोखंडेने नाबाद १:४०, २:०० मि.. संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले तर हार्दिक मोहितेने १:४५, २:०० मि.. संरक्षण करून आक्रमणात सहा गडी बाद करून चांगली लढत दिली.