रांची (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याची पत्नी साक्षीचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साक्षी केक कापताना दिसत आहे, तर धोनी तिच्यासोबत उभा आहे.
साक्षीसोबत धोनीची पहिली भेट २००७ मध्ये एका हॉटेलमध्ये झाली होती. साक्षी आणि धोनी हे दोघेही बालपणीचे मित्र असल्याचे अनेकदा सांगितले जाते. दोघांचे वडील मित्र होते. माही आणि मी बालपणीचे मित्र आहोत. आमच्या कुटुंबातील सदस्य देखील मित्र आहेत. पण आमच्यात सात वर्षांचा फरक आहे आणि आम्ही बालपणीचे मित्र नाही. ७ जुलै २०१० रोजी माहीच्या वाढदिवसाला लग्नानंतर मी पहिल्यांदा रांचीला गेले होते, असे साक्षीने म्हटले होते.
धोनी आणि साक्षी दाम्पत्याला झिवा ही मुलगी आहे. साक्षी ही इंस्टाग्रामवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. अनेकदा ती मैदानावर धोनी आणि त्याची टीम चेन्नई सुपर किंग्जला प्रोत्साहन देताना दिसते. साक्षीला इंस्टाग्रामवर जवळपास ४५ लाख चाहते फॉलो करतात.