Saturday, July 13, 2024
Homeक्रीडाडेविलियर्सच्या निवृत्तीमुळे कोहली भावुक

डेविलियर्सच्या निवृत्तीमुळे कोहली भावुक

जोहान्सबर्ग (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डेविलियर्सच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे भारताचा कसोटी, वनडे कर्णधार विराट कोहली भावुक झाला आहे.

आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूसाठी आणि मी आतापर्यंत भेटलेल्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तीसाठी… तू जे काही (करियर) केलं आहेस त्याचा तुला फार अभिमान वाटला पाहिजे. भावा तू आरसीबीला जे काही दिलं आहे त्यासाठी तुला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे. आपलं नातं हे खेळा पलिकडचं आहे आणि ते कायमच राहिले. याचा (या निर्णयाचा) माझ्या मनाला फार त्रास होतोय पण मला माहितीय तू तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला घेतलाय, जसा तू नेहमीच घेतोस. फार सारं प्रेम, असं विराटने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे डेविलियर्सनेही यावर रिप्लाय करत, माझ्याकडून पण तुला फार सारं प्रेम भावा, असं म्हटलं आहे.

डेविलियर्सने आयपीएलमध्ये बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सचे प्रतिनिधित्व केले. विराट आणि डिव्हिलियर्सची जोडी ही आयपीएलमधील सर्वात चर्चेतील जोड्यांपैकी एक आहे. मात्र आता हे दोघे ड्रेसिंगरूम शेअर करणार नाहीत. मागील तीन वर्षांपासून डेविलियर्स आयपीएलमध्ये खेळत होता. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो आरसीबीसाठी १५ सामने खेळला. यामध्ये त्याने ३१.३० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या. आता त्याने निवृत्तीची घोषणा केल्याने तो आयपीएलही खेळणार नाहीय. आयपीएलमध्ये त्याने एकूण ५ हजार १६२ धाव केल्या आहेत. तो आयपीएलच्या १८४ सामने खेळा असून त्याची सरासरी ३९.७० इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५१.६८ इतका आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व हंगामांचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.

एबीने दक्षिण आफ्रिकेकडून ११४ कसोटी सामन्यात ५०.७च्या सरासरीने ८ हजार ७६५ धावा केल्या आहेत. २२८ वनडेत ५३.५च्या सरासरीने ९,५७७ धावा तर ७८ टी-ट्वेन्टी सामन्यात ३९.७ च्या सरासरीने आणि १३५.२च्या स्ट्राईक रेटने १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूकडून खेळणाऱ्या एबीने १८४ सामन्यात १५१.७च्या स्ट्राईक रेटने ५ हजार १६२ धावा केल्या आहेत.

एबीने याआधी २३ मे २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हा त्याने आणखी काही वर्ष टी-ट्वेन्टी लीग क्रिकेट खेळणार असल्याचे म्हटले होते. पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -