भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे ट्विट
मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ”शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, धमकी कोणाला?” असा थेट सवाल करत गंभीर आरोप केले आहेत.
राज्यात एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाकडून धाडसत्र सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेतेही ईडीच्या रडारवर आहे. तर, भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील महविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप होत आहे. अशातच किरीट सोमय्यांनी अशाप्रकारचे ट्विट केले आहे.