दिल्लीपाठोपाठ मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

Share

मुंबई : हिवाळ्यात थंड, निरोगी हवेमुळे वातावरण आरोग्यदायी ठरते. मात्र मुंबईत सध्या काहीचे विपरीत चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत दिवसाच्या तापमानात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. दिवसाचे तापमान 35.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या तापमानासोबतच मुंबईच्या हवेची गुणवत्ताही घसरल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता 245 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली. मुंबईत दिवाळीच्या दिवसांमध्येही एवढी हवेची गुणवत्ता घसरली नव्हती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेची गुणवत्ता 164 एक्यूआय आणि पाडव्याच्या दिवळी 221 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली होती.

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील किमान तापमान 20 अंश सेल्सियसच्या खाली गेले होते. मुंबईत हिवाळ्याची सुरुवात झाल्याची जाणीवही झाली होती. मात्र रविवारी किमान आणि कमाल तापमानात अचानक वाढ झाली. सोमवारी शहराचे कमाल तापमान 32.8 अंश
सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 35.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. तर शहराचे किमान तापमान 25 अंश सेल्सियस आणि उपनगराचे तापमान 24.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले.

मुंबईत कुलाब्यात सर्वाधिक 345 एक्यूआय एवढी प्रदुषित हवा असल्याची नोंद झाली आहे. तर त्यानंतर माझगावमध्ये 325, बीकेसीमध्ये 314 आणि मालाडमध्ये हवेची गुणवत्ता 306 एक्युआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेची ही गुणवत्ता सर्वात घातक गटातील आहे. तसेच अंधेरीमध्येही हवेची गुणवत्ता 259 एक्यूआय एवढी नोंदवण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जास्त असल्यास, अशी हवा आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अस्थमा किंवा श्वासासंबंधी आजार असलेल्या रुग्णांनी तसेच लहान मुले व ज्येष्ठांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

हवामानातील बदलांचे आकलन करणारी संस्था स्कायमेटमधील हवामान तज्ज्ञांच्या मते, नैऋत्येकडून उष्ण हवेचे प्रवाह सुरु झाले आहेत. त्यामुळे शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. आता 21 किंवा 22 नोव्हेंबरनंतरच तापमानात काहीशी घसरण पहायला मिळेल. तसेच कर्नाटकच्या किनारी भागात एक वादळसदृश स्थिती तयार होत असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारी भागात म्हणजेच मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात 18 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट संस्थेचे प्रमुख हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी सांगितले.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

7 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

8 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

8 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

8 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

10 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

10 hours ago