गडचिरोली (वार्ताहर) : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवार राज्य पोलिसांच्या सी-६० युनिटने केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली आहे.
धानोरा तालुक्याच्या मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात शनिवारी सकाळी नक्षलविरोधी पोलीस पथक (पोलीस दलाचे सी ६० कमांडो) गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कोम्बिंग ऑपरेशन केले.
कोटगुल-ग्यारहपत्ती भागातील या मोहिमेदरम्यान नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमी पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, पोलीस पथकाने २६ नक्षलवाद्यांना ठार केले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र यामध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याचा देखील समावेश असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जवानांकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…