वसुलीसाठी पोलीस हवेत, मग ड्रग्ज रोखण्यासाठी का नकोत?


नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल




मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. अनेकांची नावे यासंदर्भात जोडली जात आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दररोज नवनवे आरोप करत अनेकांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.


‘ड्रग्ज या राज्यात यायला नकोत, भावी पिढी त्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे ड्रग्ज विरोधात कडक कारवाई करणे आणि ड्रग्ज संबंधित लोकांना तुरुंगात टाकणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकार हे करताना दिसत नाही. ड्रग्ज प्रकरणात फक्त आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. पण राज्यात ड्रग्ज येणे बंद होण्यासाठी आम्ही मोहीम सुरू करू, असे मुख्यमंत्री का बोलत नाहीत? त्यांनी कणखरपणे बोलायला पाहिजे. पोलिसांना त्यासाठी कामाला लावले पाहिजे. पोलिसांना तुम्ही वसुलीसाठी वापरता, मग ड्रग्ज राज्यात येत आहेत त्याला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर का करीत नाही?’, असा सवालही नारायण राणे यांनी केला आहे.


तसेच, ‘कोरोना हाताळायला देखील राज्य सरकार कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे यावर उपाय केले पाहिजेत. फक्त नरेंद्र मोदींवर टीका करून काही भागणार नाही. नरेंद्र मोदी हे उत्तम प्रकारे देश चालवत आहेत. तुम्हाला साधी मुंबई महानगरपालिका देखील चालवता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हे सरकार त्याबाबत काय करत आहे? सरकारमधले मंत्री फक्त लपाछपी खेळत आहेत’, असा हल्लाबोल देखील नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केला.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम