सावधान! आता आरएसव्ही व्हायरसचा धोका

Share

लक्षणे आढळल्यास चाचणी करण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच आता मुंबईत आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा व्हायरस वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे. मात्र मुंबईकरांनी न घाबरता याबाबत काही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा सुरु आहे. मुंबईची परिस्थिती पाहता सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती आहे. आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नसून त्यावर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मान्सून संपला असला तरी काही भागात पाऊस पडत आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचाच प्रकार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आरएसव्ही व्हायरस नियंत्रणात येऊ शकतो. तसेच कुठलाही ताप असला, तरी उपचार घेणे आवश्यक आहे. त्वचेला खाज येणे, ताप, खोकला ही आरएसव्हीची लक्षणे असून कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असला तरी वातावरण बदलाने व्हायरसची लागण होण्याचा शक्यता अधिक आहे. तर मुंबईकर सध्या वातावरण बदलामुळे ताप- खोकल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच कोरोनासोबतच इतर व्हायरसचीही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईत केवळ पाच जम्बो सेंटर सुरू

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने केवळ पाच कोरोना जम्बो सेंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. गरज असेल तिथेच हे वॉर्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago