महिलांसाठी बेस्टची ‘लेडीज फर्स्ट’ सेवा सुरू

  31

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रमाची लेडीज फर्स्ट सेवा शनिवारपासून महिलांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला असून या बस महिलांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. शनिवारी खास भाऊबीजेच्या दिवशीच महिलांना बेस्टकडून गिफ्ट देण्यात आले आहे.


बेस्टने दररोज ३० लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. यात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास जास्त सुखकर व्हावा या हेतूने बेस्ट उपक्रमाने लेडीज फर्स्ट ही खास महिला प्रवाश्यांसाठी सेवा सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादर, प्लाझा सिनेमा जवळील बस थांब्याजवळ या सेवेचे लोकार्पण केले. नोव्हेंबर २०१९ पासून महिलांसाठी आरक्षित बस 'तेजस्विनी' नावाने टप्प्याटप्प्यात ताफ्यात येऊ लागल्या. आजघडीला साधारण ३७ 'तेजस्विनी' धावत आहेत. मात्र सध्या बेस्टमधील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. हे पाहता महिलांसाठी १०० बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


बेस्टच्या २७ आगारांतून या बस सुटणार आहेत. सध्या ७० बस सुरू आहेत; तर उर्वरित बस लवकरच सुरू होणार आहेत. दरम्यान यामध्ये ९० बस या वातानुकूलित असणार आहेत. सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या ३७ महिला स्पेशल बस धावतात. त्यात या १०० बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या १३७ होणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याप्रकरणी कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

निष्काळजीपणा, नियोजनातील त्रुटीमुळं डोगस-सोमा जेव्ही या कंत्राटी कंपनीला भुर्दंड   मुंबई:  मे महिन्यातील

सिनेमावर कायद्याच्या बाहेर जाऊन सेन्सॉर अथवा निर्बंध घालणार नाही

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई : सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्याने एक सेन्सॉर बोर्ड तयार

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’