अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेली ईडी कोठडी आज संपली. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.


अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना तळोजा किंवा आर्थररोड कारागृहात रवानगी होणार असल्याचे समजते. दुसरीकडे ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावर सेशनकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.


दरम्यान अनिल देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे समजते. अनिल देशमुख यांनी बार मालकांकडून वसुली करायला सांगितल्याचा आरोप वाझे आणि परमवीर यांनी केला होता. या प्रकरणी परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. आता याप्रकर्णी सचिन वाझे काय माहिती देणार याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Israel - Iran War : इराण-इस्रायल युद्धात मुंबईकर तरुणाचा मृत्यू, २५ वर्षीय दीक्षितचा ड्रोनने घेतला बळी

मध्य-पूर्वेतील महायुद्ध सुरु होऊन ५ दिवस झाले असून याची झळ आता भारतालाही बसली आहे. या युद्धात भारताच्या २५ वर्षीय

Mumbai News : वरळी नाका होणार 'ट्रॅफिक फ्री'! २ किमीचा वळसा आता संपणार, पालिकेचा मास्टरप्लॅन; २ नवीन पुलांमुळे प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील सर्वात गजबजलेला भाग असलेल्या वरळी नाक्यावरील वाहतुकीचा ताण कायमचा कमी करण्यासाठी मुंबई

BMC News : प्रभाग समितीचे भाजपचे उमेदवार ठरले, नावे झाली जाहीर!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समितीपैकी ०९ प्रभाग प्रभाग समिती अध्यक्ष पदाचे उमेदवार

BMC : महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याची विट रचणार डि ठक्कर कंपनी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

BMC News : मुंबईतील १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी होणार अर्ज सादर

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड भाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्ष मुंबई (विशेष

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना