मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांना दिवाळीपूर्वी केंद्र सरकार तसेच काही राज्य सरकारांकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी इंधनदरात कपात केली आहे.
महाराष्ट्रातही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे याबाबत विचारण केली आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंधनावरील दर कमी करण्याची महाराष्ट्र सरकारची दानत नाही, अशी टीका केली आहे. ‘केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्यांचे दर कमी होतील. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले तसे आपणही करू, अशी महाराष्ट्र सरकारची दानत नाही.
‘माझी १०० टक्के खात्री आहे की, राज्य सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेणार नाही. कारण त्यांना फक्त केंद्राकडे बोट दाखवायला येते. स्वतःची जबाबदारी त्यांना कळत नाही. महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून दिलासा देईल असे मला वाटत नाही,’ असे पाटील म्हणाले.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…