Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीदोन दलित संघटनांची वानखेडेंविरोधात तक्रार

दोन दलित संघटनांची वानखेडेंविरोधात तक्रार

मुंबई (प्रतिनिधी) : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध आता दोन दलित संघटनांनी दंड थोपटले असून वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप होत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या संघटनांनी तक्रारीद्वारे केली आहे.

भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी या दोन दलित संघटनांनी वानखेडे यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. या दोन्ही संघटनांनी मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल केली आहे. वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक हे सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत आहेत. वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र बनवले. मुस्लिम असतानाही मागासवर्गीय प्रवर्गातील जात असल्याचे त्यांनी दाखवले. त्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवली व मागावर्गीयांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

‘वानखेडे यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यास तो रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे. भीम आर्मी ही चंद्रशेखर आझाद (रावण) यांची संघटना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -