मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. त्यांच्याशी संबंधित १ हजार कोटींची संपत्ती जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीय हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयातही आयकर विभागानं छापेमारी केली होती. त्यानंतर आयकर विभागाकडून अजित पवारांना नोटीस देण्यात आली.
या कारवाईअंतर्गंत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून ९० दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे. आयकर विभागानं चार मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणण्यात आल्याची माहिती आहे.