दुबई (वृत्तसंस्था) : स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या विजयानंतर किवींचे तीन सामन्यांतून चार गुण झाले आहे.
न्यूझीलंडच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडने ५ विकेट गमावून १५६ धावा करताना चांगली लढत दिली.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडने चांगली सुरुवात केली. जॉर्ज मुनसे आणि काएल कोएत्झर यांनी दबाव झुगारून खेळी केली. पण संघाची धावसंख्या २१ असताना काएल कोएत्झर बाद झाला. त्याने ११ चेंडूंत १७ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर जॉर्ज मुनसेच्या रूपाने दुसरा धक्का बसला. त्याने १८ चेंडूंत २२ धावा केल्या. या खेळीत १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मॅथ्यू क्रॉस २९ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. मॅथ्यूने अॅडम मिल्नेच्या एका षटकात ५ चौकार मारले. त्यानंतर मॅकलीऑड १२ धावा करून तंबूत परतला. ईश सोधीच्या गोलंदाजीवर रिची बेरिंगटन २० धावा करून माघारी परतला. मिशेल लीक्सने २० चेंडूंत ४२ धावांची नाबाद खेळी केली.
त्यापूर्वी, सलामीवीर मार्टिन गप्टिलमुळे (५६ चेंडूंत ९३ धावा) न्यूझीलंडला पावणेदोनशे धावांच्या घरात पोहोचता आले. अन्य सलामीवीर डॅरिल मिचेलसह (१३ धावा), कर्णधार केन विल्यमसन (०) आणि डेवॉन कॉन्व्हे (१ धाव) लवकर बाद झाले तरी ग्लेन फिलिप्ससह (३३ धावा) चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करताना गप्टिलने संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले.
स्कॉटलंडविरुद्धच्या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊन आणखी पुढे टाकले. सलग चार सामने गमावल्याने स्कॉटलंटचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…