आमच्यासोबत योग्य तो न्याय करा


क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र




मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबावर आरोप होत आहेत. या आरोपांमुळे त्रस्त झालेली समीर वानखेडे यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘आमच्यासोबत योग्य तो न्याय करा,’ अशी मागणी क्रांतीनं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात क्रांती रेडकर म्हणाली की, ‘मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा घेऊन मी आज माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरुद्ध उभी आहे. लढते आहे. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.


आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रुची लख्तरं चारचौघात उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रिच्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच हे पटलं नसतं. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.' असे क्रांती आपल्या पत्रात म्हणाली.

Comments
Add Comment

नोंदणीकृत फेरीवाल्यांना 'क्यूआर कोड' ओळखपत्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका क्षेत्रातील ९९,४३५ नोंदणीकृत अधिकृत फेरीवाल्यांना येत्या १० जूनपासून

Air India : कलिनातील एअर इंडिया वसाहत अखेर रिकामी

मुंबई : कलिना येथील १८४ एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेली एअर इंडियाची ऐतिहासिक कर्मचारी वसाहत (स्टाफ कॉलनी) अखेर

Weater Update : राज्यातील २३ जिल्ह्यांना हायअलर्ट, मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

मुंबई : पुढील २ दिवसांमध्ये केरळसह तमिळनाडूमध्ये मान्सून धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक

Pratap Sarnaik: स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप

दख्खनची राणी'चे ९७ व्या वर्षात पदार्पण

मुंबई : मध्य रेल्वेची अत्यंत लोकप्रिय आणि मानाची ट्रेन असलेल्या “डेक्कन क्वीन” (दख्खनची राणी) ने सोमवारी १ जून

Devendra Fadnavis : सोशल मीडियाच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मुंबई : "आधुनिक काळात