Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाइंग्लंडला बांगलादेशविरुद्ध सलग दुसऱ्या विजयाची संधी

इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध सलग दुसऱ्या विजयाची संधी

अबुधाबी (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेतील बुधवारी (२८ ऑक्टोबर) ग्रुप १मध्ये इंग्लंड आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. टी-ट्वेन्टी क्रमवारीतील वरचे रँकिंग तसेच आश्वासक सुरुवात पाहता ब्रिटिश संघाला सलग दुसऱ्या विजयाची संधी आहे.

सलामीला गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ६ विकेट आणि ७० चेंडू राखून हरवताना इंग्लंडने विजयी प्रारंभ केला. गोलंदाजांचा अचूक मारा हे त्यांच्या मोठ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. बांगलादेशला श्रीलंकेकडून ५ विकेटनी मात खावी लागली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रत्येक गोलंदाजाने धावा रोखतानाच विकेट घेत सांघिक कामगिरी उंचावली. बांगलादेशविरुद्ध कर्णधार जोस बटलरला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. बॉलर मॅचविनर ठरले तरी ५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ विकेट गमवाव्या लागल्या. त्यामुळे त्यांना फलंदाजीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुलनेत बांगलादेशची गोलंदाजी कमकुवत वाटते. पहिल्या सामन्यात त्यांनी २० ओव्हर्ससाठी ७ गोलंदाज वापरावे लागले.

श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला तरी बांगलादेशची फलंदाजी वाईट झाली नाही. सलामीवीर मोहम्मद नईम आणि मुशफिकुर रहिमने चांगली फटकेबाजी केली. त्यांच्यामुळे अन्य सलामीवीर लिटन दास, अष्टपैलू शाकीब अल हसन तसेच अरिफ होसेन यांचे अपयश झाकले गेले. इंग्लंडची गोलंदाजी बहरली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांसमोर सातत्य राखण्याचे मोठे आव्हान होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -