सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू

जव्हार (वार्ताहर) : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळशेत ग्रामपंचायतीमधील पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (२१) या आदिवासी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला शेतात काम करताना सर्पदंश झाला होता. तिचा पती व नातेवाइकांनी तातडीने डोली करून दोन किलोमीटर अंतरावरच्या पिंपळशेत आरोग्य पथकात मायाला नेण्यात आले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारा जबाबदार वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने अखेर मायाचा तेथेच मृत्यू झाला. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याने संपूर्ण जव्हार तालुक्यात आरोग्य यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.


अतिदुर्गम जव्हारमधील पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीमधील नागरिकांना रस्ता, वीज, पाणी आणि आरोग्याच्या समस्येने स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ग्रासलेले आहे.


येथे वैद्यकीय उपचारांअभावी आजपर्यंत शेकडो बळी गेले आहेत. अशीच घटना पुन्हा शनिवारी घडली आहे. पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (२१) ही आदिवासी गर्भवती महिला दुपारी शेतात काम करताना तिला विषारी सापाने दंश केला.


मायाच्या पती व नातेवाइकांनी तिला डोली करून दोन किलोमीटर पायपीट करत पिंपळशेत आरोग्य पथकात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारे कोणीही उपलब्ध नव्हते. केवळ एक शिपाई होता. अखेर तेथेच मायाचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.


साप, विंचू चावल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचारांसाठी पुरेसा औषधसाठा नसतो. तसेच, पिंपळशेत आरोग्य पथक येथे रिक्त पदे असल्याने व तिथे कर्मचारी राहत नसल्याने अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी. - तुळशीराम भोवर, सामाजिक कार्यकर्ते


पालघर जिल्ह्याऐवजी जव्हार जिल्हा झाला असता, तर आरोग्य सुविधा सुधारली असती. येथील नागरिकांचे आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे जाणारे बळी थांबण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी भरती होणे गरजेचे आहे. शिवाय, पालघर जिल्हा तसेच जव्हार तालुका आरोग्य विभागाकडून भरती होईपर्यंत व्यवस्था होणे अपेक्षित आहे. - कैलास घाटाळ, मनसे, जव्हार तालुका सचिव


या ठिकाणी जे कर्मचारी कामावर नव्हते, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - डॉ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी