१०० दिव्यांग लाभार्थींना मिळाले कृत्रिम हात

  72

मुंबई : ग्रँड मराठा फाउंडेशन आणि इनालि फाउंडेशनच्या माध्यमातून १६ ते ६० वर्षे या वयोगटातील १०० दिव्यांग लाभार्थींना कृत्रिम हात मोफत पुरविण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. रोहित शेलटकर (संस्थापक, जीएमएफ), माधवी शेलटकर (विश्वस्त, जीएमएफ) आणि प्रशांत गाडे (संस्थापक, इनालि फाउंडेशन) यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.


या उपक्रमाविषयी माहिती देताना चित्रपट निर्माते आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले, कृत्रिम हातामुळे लाभार्थी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. मर्यादित आर्थिक स्रोत असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांनी पुढे यावे आणि फाउंडेशनशी जोडले जाऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच 'गरजूंचे सबळीकरण' या कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी दात्यांनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://grandmaratha.org/ या वेबसाइटला भेट द्यावी.

Comments
Add Comment

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात