मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली ३५ अतिक्रमणे पी/दक्षिण विभाग कार्यालयाने जमीनदोस्त केली आहेत. आतापर्यंत पी/दक्षिण विभाग हद्दीतील एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी २,१५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी समस्येतून दिलासा देण्यासाठी गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरणारी एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. तर पी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील १५० फूट रुंदीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाच्या दक्षिणेकडील व चित्रनगरी रस्त्याच्या पश्चिमेकडील अशा एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्ता रेषांमध्ये ही अतिक्रमणे होती.
यापैकी पहिल्या टप्प्यात जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील ५२ अतिक्रमित बांधकामे २ वर्षांपूर्वी काढली गेली. तर दुसऱ्या टप्प्यात ३५ अतिक्रमित बांधकामे हटवण्याची कारवाई पी/दक्षिण विभागाने पूर्ण केली. या कारवाईमुळे २१० मीटर लांबीची रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूची जागा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर अखेरची शिल्लक असलेली १४ अतिक्रमित बांधकामे लवकरच प्राधान्याने काढण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…
मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…