Sunday, July 14, 2024
Homeक्रीडापी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

डेन्मार्क ओपन

ओडेंसे डेन्मार्क (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके पटकावणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफामनला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जगातील क्रमांक ८वर असलेल्या कोरियाच्या एएन सेयाँगसमवेत होईल.

सिंधूने ६७ मिनिटे चालेल्या सामन्यात २१-१६, १२-२१, २१-१५ अशा सेटमध्ये बुसाननचा पराभव केला. ऑगस्ट महिन्यात ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर सिंधूची ही पहिली स्पर्धा आहे. त्यानंतर सिंधूने ब्रेक घेतला होता आणि डेन्मार्क ओपनमधून खेळण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वीच्या सामन्यात सिंधूने टर्कीच्या नेस्लिहान यिगिटवर २१-१२, २१-१० असा सरळ गेममध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर सिंधूची बुसानन ओंगबामरुंगफानशी सामना झाला.

दुसरीकडे, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कारकिर्दीत जवळपास प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे आता तिने फक्त ऑल इंग्लंडचे अजिंक्यपद मिळवावे, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -