अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला अटक

  113

मुंबई (प्रतिनिधी) : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारी याला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते.


सुरेश पुजारीने २००७मध्ये भारताबाहेर पलायन केले होते. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याचे समजते. आता फिलिपिन्समधून त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवरही होता. एफबीआयनेच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या मागावर होत्या. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात