दुबई (वृत्तसंस्था) : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे बीसीसीआयने सोपवलेल्या मार्गदर्शकाच्या भूमिकेवर पाकिस्तानने प्रथमच भाष्य केले आहे. धोनीचा अनुभव भारताच्या पथ्थ्यावर पडेल, असे माजी क्रिकेटपटू सलमान बटने म्हटले आहे.
महेंद्रसिंह धोनी एक यशस्वी कर्णधार आणि चांगला क्रिकेटपटू होता. तो भारतीय संघाला चांगले मार्गदर्शन करू शकतो. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाने चांगले क्रिकेट खेळले आहे. मात्र अंतिम फेरीत आपली योजना योग्य पद्धतीने अवलंबताना दिसत नाही. धोनीकडे अंतिम सामना जिंकण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवणे सोपे होईल. त्यामुळेच त्याला मार्गदर्शकाची जबाबदारी दिली आहे, असे बटने म्हटले आहे.
धोनी भारतीय संघासोबत आता युएईत आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती ट्वीट करून दिली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये धोनी भारतीय संघासोबत असणार आहे. बीसीसीआयने दोन फोटो ट्वीट करत महेंद्रसिंह धोनी संघासोबत असल्याची माहिती दिली आहे. महेंद्रसिंह धोनीचं स्वागत. धोनी नव्या भूमिकेसह टीम इंडियासोबत आहे, अशी पोस्ट बीसीसीआयने लिहिली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-ट्वेन्टी तसेच वनडे वर्ल्डकप जिंकला आहे.