Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडाऋतुराजचे जल्लोषात स्वागत

ऋतुराजचे जल्लोषात स्वागत

पुणे (प्रतिनिधी) : चेन्नई सुपर किंग्जच्या चौथ्या आयपीएल जेतेपदात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे रविवारी पुण्यात जल्लोषात स्वागत झाले.

साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना भावला. आयपीएल २०२१ स्पर्धेसह कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करून तो पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या घरी परतला तेव्हा तो गाडीतून अनवाणी पायाने उतरला. परंपरेनुसार कुटुंबातील सदस्यांनी ऋतुराज ओवाळले. त्याचे पाय धुतले. यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईडून खेळताना गायकवाडने सर्वांची मने जिंकली. धडाकेबाज फलंदाजी करताना त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा करताना मानाची ऑरेंज कॅप पटकावली. १६ सामन्यांत त्याने ६३५ धावा केल्या आहेत. या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -